तब्बल तेरा वेळा सर्पदंश; एकाच वर्षात १० वेळा सर्पाशी सामना, कुटुंबीय चिंतेत

यावल (जळगाव) : तुम्ही आतापर्यंत एखाद्या व्यक्ती एक, दोन किंवा फार तर तीन वेळा सर्पदंश झाल्याची ऐकले, पाहिले असेल. परंतु आज आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत ते वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एकाच व्यक्तीला तब्बल  तेरा वेळा सर्पदंश झाला आहे. 
यावल तालुक्यातील दहिगाव येथील ४० वर्षीय व्यक्तीला तब्बल तेराव्यांदा सर्पदंश झाला आहे. बुधवारी (ता. २५) ते गावातील मागासवर्गीय वस्तीत काम करत असताना त्यांना सापाने चावा घेतला. तर यापूर्वी त्यांना सापाने १२ वेळा दंश केला असून ही १३ वी वेळ आहे. गणेश यांना यापूर्वी एप्रिल २०१७ ते ऑक्टोंबर २०१७ सात महिन्याच्या काळात तब्बल १० वेळा सर्पदंश झाला होता. तेव्हा देखील गावासह तालुक्यात मिस्तरींवर सापाचा डावतर नाही, नागिनचा बदला तर नसावा, अशा विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, नंतर हा प्रकार थांबला. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना सर्पदंश झाला. आता पुन्हा त्यांना बुधवारी सर्पदंश झाल्याने २०१७ ची पुनर्रावृत्ती होईल की काय, अशी भीती कुटुंबाकडून व्यक्त होत आहे 

प्रकृती स्थिर

दहिगाव (ता. यावल) येथील रहिवासी गणेश देविदास मिस्तरी (सुतार) या व्यक्तीला बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सर्पदंश झाला. लघुशंकेकरीता तेथील सार्वजनिक शौचालयात गेले असताना सापाने दंश केला. सदर प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, अधिपरिचारीका शितल ठोंबरे, संजय जेधे, बापू महाजन यांनी उपचार केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e