औरंगाबाद : हातात तलवार घेवून शहारात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. शहरातील पंचायत समिती परिसरात एक तरुण तलवार घेऊन उभा असल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्या परिसरात धाव घेत तलवारबाज तरुणाच्या मुसक्या आवळल्या. मोहम्मद राफेउद्दीन असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, तलवार घेवून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांमुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरात तलवार घेवून दहशत पसरवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबाद शहरातील पंचायत समिती परिसरात एक तरुण तलवारीनं नागरिकांना भयभीत करण्याच्या प्रयत्नात होता. मोहम्मद राफेउद्दीन असं त्या तरुणाचं नाव आहे. मात्र, या प्रकाराबाबत पोलिसांना खबर मिळताच मोहम्मदचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. त्यानंतर मोहम्मदला पोलिसांनी अटक केली.
लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जीवघेण्या स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तलवारीनं केक कापण्याचं फॅडही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा तरुणांना वचक बसवण्यासाठी पोलिसांनी आणखी कठोर पावलं उचलणं गरजेचे आहे.
0 Comments