चाकूचे वार करत तरुणाची निर्घृण हत्या; टोळक्याविरोधात गुन्हा दाखल

नाशिक: म्हसरुळ येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नाशिकच्या म्हसरुळ परिसरात असलेल्या आकाश पेट्राेल पंपाजवळील सावकार गार्डन याठिकाणी एका २५ वर्षीय तरुणाची एका टोळक्याकडून धारदार शस्त्रांनी हत्या  करण्यात आली. रात्री अकरा वाजता पाच जणांच्या टाेळक्याने २५ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे.
या घटनेत मृत तरुणाचा मित्र थोडक्यात बचावला आहे. हल्लेखोर टोळक्याच्या (Gang) तावडीतून निसटून आल्यावर त्याने घटनेची माहिती दिली. याबाबत म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यश रामचंद्र गांगुर्डे (24, रा. राजवाडा, म्हसरुळ) असे मृताचे नाव आहे. मृत यश हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत हाेता. तर फरशी बसवण्याचेही काम करत हाेता, अशी माहिती समाेर आली आहे. त्याने एक वर्षांच्या मुलाचा वाढदिवस नुकताच साजरा केला हाेता.
यश आणि त्याचा मित्र बुधवारी रात्री पावणे अकरा ते अकराच्या सुमारास सावकार गार्डन जवळून जात असताना संशयित दीपक पगारे आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी त्या दोघांना अडवून वाद घातला. त्यानंतर चाॅपरने वार करुन यशची हत्या केली. त्याचवेळी यशचा मित्र घटनास्थळावरुन निसटून आला. त्याने घटनेची ओरड करुन कुटुंबाला माहिती दिली. त्यानंतर सहायक आयुक्त मधुकर गावित, म्हसरुळचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशाेक साखरे आणि गुन्हे शाेध पथक दाखल झाले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी म्हसरुळ राजवाड्यातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली हाेती. एकूणच नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e