तथापि याआधी शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दावा करतांना म्हटले आहे की, अक्राणी येथे विधानसभा प्रचारावेळी आले असतांना शिवसैनिकांनी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन आवश्यक असल्याची माहीती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याच अनुषंगाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व ग्रामपंचायत विभाजनासाठी शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी 3 ते 4 महिने सातत्याने पाठपुरावा केला, असेही रघुवंशी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
एकंदरीत या दावे-प्रतिदाव्यामुळे महा विकास आघाडीतील नेत्यांमध्ये विभाजनावरून जुंपल्याचे चित्र बनले आहे.
नंदुरबार जिल्हयातील विभाजन होणाऱ्या ग्रामपंचायती
- धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायती 1) मांडवी बु. 2) भुषा 3) राजबर्डी 4) तोरणमाळ 5) रोषमाळ 6) गेंदा 7) चिंचकाठी 8) बिजरी 9) चिखली 10) कात्री
- अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत 1) उमरागव्हाण
- नवापुर तालुक्यातील ग्रामपंचायत 1) करंजवेल 2) पाटी बेडकी
- नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत 1) राकसवाडे
- शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत 1) कलमाडी त.बो.
0 Comments