प्रेयसी आपल्याला सोडून दुसऱ्याबरोबर लग्न करत असल्याच्या रागातून प्रेयसीला शेवटचे भेटण्याच्या निमित्ताने प्रियकर तिच्या घरी गेला होता. नायलॉन दोरीने प्रेयसीचा गळा आवळून उशीने नाक तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर त्याच नायलॉन रस्सीने स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी अनिल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक मधील वडनेर भैरव मध्ये राहणाऱ्या अनिल साळुंखे याचे डोंबिवली मधील २८ वर्षीय तरुणीबरोबर प्रेम संबध होते. मात्र अनिल हा विवाहीत असून त्याला दोन मुले असल्याची माहिती ललिता हिच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले
आणि काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा देखील केला. मात्र आपली प्रेयसी दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करत असल्याचे कळताच अनिलला धक्का बसला
त्यानंतर त्याने २९ मे रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात प्रेयसीच्या घरी गेला. त्यावेळी त्याने ललिताचा नायलॉन दोरीने गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता त्याने उशीने नाक तोंड दाबून तिची हत्या केली. यानंतर त्याच नायलॉन रस्सीने त्याने स्वता पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.दरम्यान सकाळी ११ वाजता हाका मारूनही बहीण दरवाजा उघडत नसल्याने ललिताच्या बहिणीने दरवाजा उघडला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत तिला कळले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
0 Comments