अवैध सावकारी प्रकरणी महिलांसह चौघांवर गुन्हा

धुळे : अवैध सावकारी, धनादेश न वटण्याच्या खोट्या केसेस करणे, पठाणी व्याज वसुली आणि मूळ कागदपत्रे परत न केल्या प्रकरणी व्यावसायिकाने तीन महिलांसह चौघांविरूध्द येथील शहर पोलिस (ठाण्यात मंगळवारी  रात्री गुन्हा दाखल केला.
येथील नेहरूनगरमधील रहिवासी, खासगी वाहनचालक आणि जयहिंद महाविद्यालयाजवळील मयूर हॉटेलचे प्रवर्तक मयूर अशोक सोनवणे वय ३१ यांनी २०१४ ते २०२० या कालावधीत आर्थिक अडचणीमुळे मिल परिसरातील व सध्या  नाशिक मुक्कामी असलेले रवींद्र कासूमल खत्री यांच्याकडून वेळोवेळी दीड लाख, तीन लाख, नंतर साडेसात लाखांचे कर्ज घेतले. ते दरमहा आठ टक्के व्याजदराने घेताना स्टँप पेपर, तो नोटरी करणे, कोरे धनादेश खत्री याला दिले. सोनवणे यांनी वेळोवेळी कर्जाची परतफेड केली.

कर्ज फेडूनही कागदपत्रे परत नाही

मात्र, साडेसात लाख कर्जाचे १६ ते १७ लाख फेडूनही खत्री याने सोनवणे यांची मूळ कागदपत्रे, धनादेश परत केले नाहीत. उलट पत्नी सविता खत्री, प्रिया राकेश शर्मा (रा. कोरेनगर, मिल परिसर), पूजा नरेंद्र वाडेकर (रा. मिरजकरनगर, चाळीसगाव रोड) आणि रवींद्र या चौघांनी संगनमताने धनादेश न वटण्याबाबत, उसनवारीचे पैसे न दिल्याबाबत खोट्या केसेसे केल्या, धमक्या देत रवीद्र याने मयूर हॉटेलवर तोडफोडीचीही धमकी दिली, काही महिला व मुलांना वसुलीसाठी मागे लावेल, अशीही धमकी दिल्याची फिर्याद मयूर सोनवणे यांनी दिली. त्यानुसार संशयित चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e