उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना दिला राजीनामा राजभवनात शिवसैनिकांची घोषणाबाजी

उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही सोबत होते. राजभवनावर जाऊन ते आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली असून येत्या दोन दिवसात सत्ता स्थापन करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असून येत्या 1 तारीखलाच ते शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
संपुर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेला निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार की नाही याबाबतचा आता मोठा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असून ठाकरे सरकारचे भवितव्य काय ते उद्याच कळणार आहे. कारण मविआ सरकारची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे.
सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी हे युक्तीवाद करत आहेत. राज्यपालांनी इतक्या घाईने बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितले. आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टातच ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ११ जुलै रोजी हे आमदार अपात्र घोषित केल्यानंतर काय होईल? , असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला.
मुंबईत मातोश्रीवरील बैठक संपल्यानंतर आता सर्वच प्रमुख नेते बाहेर पडले आहेत. बैठकीनंतर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला कोर्टात न्याय मिळेल. निकलानंतर पुढील दिशा ठरवू, असे ते म्हणाले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभा उपाध्यक्ष आणि प्रधान सचिवांची विधानभवनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी बहुमत चाचणी दरम्यान आसनव्यवस्था बदलू नये अशी आपण मागणी केली असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ठरवतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी विनंती आम्ही कालपर्यंत केली, पण आता उशीर झाला आहे, असे केसरकर म्हणाले.
बंडखोर आमदारांचा गट पणजीला निघण्यापूर्वी कामाख्य मंदिराकडे निघाले आहेत. बहुमत चाचणीआधी बंडखोर आमदार दर्शन घेणार आहेत. या आमदारांसोबत एकनाथ शिंदे देखील आहेत.

सिल्व्हर ओक आणि मेघदूत येथे झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीची भूमिका

सुप्रीम कोर्टात आज संध्याकाळी ५ वाजता होणार सुनावणी

कोर्टातील सुनावणीनंतर महाविकास आघाडी आपली भूमिका घेणार 


राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांनी सकाळी बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या सूचना पत्राद्वारे केल्या आहेत. त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेत्यांनी तातडीने मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे. रणनीती आखण्यासाठी ही बैठक होत आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते बैठकीसाठी मातोश्रीवर जात आहेत.

राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचं राजकारण आता निर्णायक स्थितीत आलं आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, याच याचिकेवर आता सुप्रीम कोर्टाची सुनावणी आज बुधवारी संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. आजच दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवसेनेकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे.

मुंबई: राज्यपालांच्या पत्राला शिवसेनेने (ShivSena) आक्षेप घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. आमदारांच्या कारवाईवर दोन आठवड्यांचा वेळ दिला आणि बहुमत चाचणीला २४ तासांचा वेळ दिला, यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. ही याचिका जेव्हा लिस्टेड होणार तेव्हा ही याचिका घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e