धुळे : आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडत गुंतवणूकदारांकडून कोट्यावधीची माया जमा केली. ही रक्कम घेऊन पसार होणाऱ्या दोघा भावांपैकी एकाच्या धुळे पोलिसांनी जळगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत.
धुळ्यातील बहुतांश गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झालेल्या दोघा भावांपैकी एकाला धुळे पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. या दोघा भावांनी नॅशनल स्क्रॅप फर्मच्या नावाने गुंतवणूकदारांना आकर्षक स्कीमद्वारे आमिष दाखवले व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रेरित केले. गुंतवणूकदारांची यामध्ये फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या दोघेही भावांनी पळ काढला होता. यासंदर्भात धुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांपैकी एकाच्या जळगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत.
दीड कोटीच्याजवळ रक्क
दोघा भावांनी देखील जवळपास एक कोटी एकेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार फसवणूक केले असल्याची माहिती उघडकीस आली आहे, या रकमेमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली असून याबाबत आणखी कोणी गुंतवणूकदार या दोघा भावांकडून फसवणुकीचे शिकार बनले असतील त्यांनी पोलिसांकडे येऊन या संदर्भातील माहिती देण्याचे आवाहन देखील पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी केले आहे.
0 Comments