मुख्‍यमंत्री उध्दव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेनेची जळगावात रॅली

जळगाव : उध्दव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत जळगाव शहरात शिवसेनेतर्फे रॅली काढण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदेसह सर्व आमदार शिवसेनेत  परत येतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली
जळगाव येथील शिवसेनेच्या गोलाणी संकुलातील कार्यालयापासून ही रॅली काढण्यात आली. जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, महापौर जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.

कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

रॅलीच्या अग्रभागी उध्दव ठाकरे यांची प्रतिमा कार्यकर्त्यांच्या हातात होती. शिवसेना जिंदाबाद, उध्दव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत ही रॅली टॉवर चौकात गेली. त्या ठिकाणी रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e