नंदुरबारला पाणी टंचाई; आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा

नंदुरबार : पावसाळा सुरू होवून अद्याप चांगला पाउस झालेला नाही. यामुळे पाणी टंचाईचा प्रश्‍न उद्‌भवला आहे. परिणामी नंदुरबार शहरामध्‍ये आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. याची सुरवात २८ जूनपासून होणार आहे.
नंदुरबार परिसरात अजूनपर्यंत पाऊस पडलेला नाही. पेरण्या सुध्दा झालेल्या नाहीत. अशा बिकट परिस्थितीज पाणी किती दिवस पुरेल याची खात्री नाही. मध्यंतरी विद्युत विभागाच्या अडचणीमुळे दोन दिवस पाणी पुरवठा अनियमित झाला होता. आज ही पिवळसर पाणी शहरामध्ये धरणातील मृत साठ्यामधील असल्याने येत आहे व नगरपरिषदेच्यावतीने पाणी उकळून प्यावे असे आवाहन सुध्दा आम्ही केलेले आहे.

पाणीसाठी वाढेपर्यत दोन दिवसाआड पाणी

नंदुरबार नगरपरिषदेने पुढील सर्व परिस्थितीचा विचार करुन 28 जूनपासुन दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. जोपर्यंत धरणातील पाणीसाठा वाढत नाही; तोपर्यंत दोन दिवसाआड नंदुरबार शहराला पाणी पुरवठा आम्ही करु. जनतेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e