जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिग्गजांचे गणित बिघडले; वाढीव गट, गणांवर २५ हरकती

जळगाव : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या नवीन प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. वाढलेले गट व गणाच्‍या प्रभाग रचनेमुळे अनेक दिग्‍गजांचे गणित बिघडले आहे. या रचनेबाबत काहींचा आक्षेप असून आतापर्यंत २५ हरकती घेण्यात आल्या आहेत 

जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ७७ गट व १५४ गणाची प्रारूप प्रभाग रचना २ जूनला जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ९ गट व १८ गण असून सर्वात कमी २ गट व ४ गण बोदवड तालुक्यात आहेत. प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये समाविष्ट ग्रामपंचायती निश्चीत करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या.

चाळीसगावमधून सर्वाधिक हरकती

सुधारीत प्रारूप रचनेवर हरकत असल्‍यास मागविल्‍या होत्‍या. त्‍यानुसार आतापर्यंत २५ हरकती आल्‍या असून सर्वाधिक हरकती चाळीसगाव तालुक्यातील आहेत. नागरिकांकडून प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेत स्वीकारण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e