इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात सापडले 10 लाखांचे दागिने, लॉन्ड्रीचालकाने मनाशी पक्क केलं आणि....

इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांच्या पिशवीत एका लॉन्ड्री चालकाला (सापडलेले सुमारे 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसंच 20 हजार रुपयांची रोख रक्कम त्याने संबंधित ग्राहकाला परत केली. त्याच्या या कृतीने प्रामाणिकपणा आजही शिल्लक असल्याचे उत्तम उदाहरण बघायला मिळाले.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात ही घटना घडली आहे. मनात कुठलाही मोह न बाळगता लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांनी इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात सापडलेले तब्बल दहा लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम निरपेक्ष भावनेने ग्राहकास परत केली आहे. राजेश वाघमारे यांच्याकडे एका ग्राहकाने पिशवी भरून कपडे इस्त्रीसाठी आणले होते.

तिसऱ्या दिवशी इस्त्रीसाठी पिशवीतील कपडे बाहेर काढत असताना राजेश वाघमारे यांना त्या पिशवीत एक छोटीशी कापडी थैली आढळून आली. यामध्ये सोन्याची कर्णफुले, नथ, बांगड्या व इतर दागिने तसेच रोख रक्कम 20 हजार रुपये आढळून आली. वाघमारे यांनी लागलीच संबंधित ग्राहकाला सोन्याचे दागिने तसेच रक्कम घेऊन जाण्याची विनंती केली.

लॉन्ड्री हा आमचा पारंपारिक व्यवसाय असून आई-वडिलांनी पहिल्यापासून अतिशय चांगले संस्कार आणि प्रामाणिकपणाची शिकवण दिली आहे. त्यामुळे सोने, नाणे, पैसा यापेक्षाही नीतिमत्ता व व्यवसायातील प्रामाणिकपणा हा खूप किमती असल्याचं वाघमारे म्हणत आहेत..

सोने, पैसा, संपत्ती यांचे आकर्षणा पायी भ्रष्ट झालेल्या सध्याच्या युगात राजेश वाघमारे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e