धक्कादायक! प्रेम प्रकरणातून त्याने ३ महिलांना संपवलं; मुंबईतील थरारक घटना

मुंबई : राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे एक भयावह घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरात असलेल्या दळवी रुग्णालयात तीन महिलांसह एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
प्रेम प्रकरणातून तीन महिलांची हत्या करून आरोपीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमि दळवी, शिव दयाल सेन अशी मृताची नावे आहेत. 
यातील शिवदयाल सेन याच्या खिशात सुसाइड नोट सापडली असल्याची माहिती आहे. या नोटमध्ये भूमि याच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिकचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e