घरात झोपलेल्या सावत्र आईसोबत मुलाचं भयंकर कृत्य; पुण्यातील थरारक घटना

पुणे : पुण्यातील  भोर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका सावत्र मुलाने आपल्या आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मुलाने झोपेत असलेल्या असलेल्या सावत्र आईच्या डोक्यात दगडी पाट्याने वार केला, यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे
रेश्मा अंकुश शिंदे (वय 36) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. तर शिवम अंकुश शिंदे असं फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री रेशमा ह्या घरात झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांचा सावत्र मुलगा शुभम याने घरातील दगडी पाट्याने रेश्मा यांच्या डोक्यात वार केला

या घटनेत रेश्मा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर शिवम हा घरातून पसार झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने भोर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून शिवमने आपल्या आईचं खून का केला? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e