लातुरात चोरीचे चार गुन्हे उघडकीस; १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

लातूर - जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस  ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. विशेषत: मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता विशेष पथक स्थापन करण्यात आले असून, त्यांच्याकडून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात चार गुन्हे उघड झाले असून, १ लाख १७ हजारांच्या मुद्देमालासह तिघाजणांना अटक करण्यात आली आहे.
पथकांकडून माहितीचे संकलन करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गरुड चौक, नांदेड रोड परिसरात चोरीच्या मोटारसायकलींची खरेदी व विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली. या खात्रीशीर माहितीवर पथकाने गरुड चौक परिसरात सापळा रचला असता पथकाने गरुड चौक परिसरात मोटारसायकलींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करीत असताना एकाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांचे नाव करण तुकाराम सूर्यवंशी (रा. उदगीर), सखाराम कांबळे (बनशेळकी रोड, उदगीर), सुनील अशोक बुक्का (बनशेळकी रोड, उदगीर) असल्याचे समजले. गुन्हे शाखेच्या पथकाने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी लातूर शहरात विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची माहिती मिळाली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e