नंदुरबार : गुजरात परिवहन विभागाची एसटी बस मालेगावहुन सुरतला जात असताना महाराष्ट्र गुजरात सीमेवरील चरणमाळ घाटात बसच्या पुढच्या चाकांचा एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानाने ब्रेक निकामी झाल्यानंतरही बसवरील ताबा न सोडता रस्त्याच्या कडेला बस उभी करण्याचा प्रयत्न केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे
मालेगावहुन सुरतला जाणाऱ्या या बसमध्ये एकूण 28 प्रवासी होते. जवळपास 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नवापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक बोरझर गावातील नागरिक व रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी बस अपघातमधील प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात मोठी मदत केली.
घाट रस्ता असूनही कठडे नाही
चरणमाळ घाट रस्ता तीव्र उताराचा असल्याने वारंवार अपघात होत असल्याने तीव्र उताराच्या वळणावर कठडे तयार करावे तसेच घाटात पोलीस चौकी उभारावी अशी मागणी करण्यात येत आहे.
0 Comments