पहाटे पुजेसाठी अगरबत्ती पेटवली आणि गॅस सिलेंडरचा स्फोट; कल्याणमधील हादरवणाऱ्या घटनेचे फोटो पाहा…

कल्याणमध्ये पुजेसाठी अगरबत्ती पेटवल्याने गॅस सिलेंडरच्या स्फोटाची घटना घडली. या स्फोटात एक ६५ वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे.
हनुमंत मोरे असे जखमीचे नाव असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे रविवारी (१७ जुलै) पहाटे ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास उठले.ते सकाळी अंघोळ करून देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी लायटर पेटवण्यासाठी गेले आणि घरातील सिलेंडरचा स्फोट झाला.यावेळी घरात असलेले हनुमंत मोरे जवळपास ४० टक्के भाजले. स्फोटाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.स्फोट झाल्याची माहिती मोरे यांच्या मुलाला व पोलिसांना देत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यानंतर त्यांच्या मुलाला याची माहिती मिळताच त्यांनी वडिलांना मुंबईच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.दुसरीकडे पहाटे झालेला हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात घराचे पत्रे हवेत उडाले, तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले.
या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. स्फोटाचं नेमकं कारण काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e