महापौर पदाच्या उमेदवारीसाठी 15 जुलैला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असताना माजी महापौर प्रदीप करपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. दुसरा कोणाही उमेदवाराचा अर्ज महापौर पदासाठी दाखल न झाल्यामुळे महापौर पदावर भाजपचे प्रदीप कर्पे यांच्या नावावर शीकामोर्तब झाला होता. परंतु प्रशासकीय औपचारिकता आज पूर्ण करण्यात आली असून निवडणूक अधिकारी व धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये आज अधिकृतरित्या प्रदीप करपे यांच्या महापौर पदाच्या नावावर शिक्कामार्फत झाला आहे.
भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये आज महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेमध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महापौर पदाचे प्रमाणपत्र बहाल करीत प्रदीप करपे यांना महापौर पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या. प्रशासनातर्फे अधिकृतरित्या महापौर पदावर करपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत नवनिर्वाचित महापौर प्रदीप कर्पे यांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments