शरीरात बंदुकीच्या गोळ्या आणि कुजलेला मृतदेह; मुंबई-नाशिक महामार्गावर गाडीत आढळला बेपत्ता स्टॉक ब्रोकर

मुंबई-नाशिक महामार्गावरील खराडी गावाजवळ वांद्रे येथील एक 52 वर्षीय स्टॉक ब्रोकर त्याच्या एसयूव्हीमध्ये कारमध्ये मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा होत्या. मृत प्रफुल्ल पवार यांचा मृतदेह त्यांच्या स्कॉर्पिओमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यांची हत्या २-३ दिवसांपूर्वी झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालात पवार यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे 
यानंतर शहापूर पोलिसांनी हत्या आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे शेअर ब्रोकर आणि ट्रेनर होते. गेल्या २-३ दिवसांपासून त्यांचं वाहन खराडीजवळ रस्त्याच्या कडेला उभं होतं. त्यामुळे स्थानिकांमध्ये संशय निर्माण झाला होता. यामुळे स्थानिक नागरिकांनी रविवारी शहापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस तपासणीत गाडीमध्ये पवार यांचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी सांगितलं की तपासणीदरम्यान त्यांना वाहनात एक चेकबुक सापडलं. ज्यावरून पोलिसांनी पवार यांचा वांद्रे येथील पत्ता शोधला. त्यांनी वांद्रे येथील पोलिसांना याबद्दल माहिती दिली. याच ठिकाणी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पवार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मृत पवार यांचा कोणासोबत काही वाद किंवा शत्रुत्व होतं का हे शोधण्यासाठी पोलीस कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडे चौकशी करत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e