या अत्याचारातून पीडिता गरोदर राहिली असून तिच्या तक्रारीनुसार बुधवारी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेला आधार नसल्याने तिला जळगावा शासकीय आशादीप वसतीगृहात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी ती सासरी असतांना मोठ्या दिराने पीडितेला मुलाला मारुन टाकेल अशी धमकी देत इच्छेविरुध्द पीडितेसोबत शारिरीक संबध प्रस्थापित केले. यामुळे त्याच्यापासून पीडिता गरोदर राहिली. त्यानंतर एवढेच नाहीतर सासू, सासरे जाऊ यांनी पीडितेच्या पोटावर हाता-बुक्यांनी मारहाण केली. तसेच, शिवीगाळ करत तिचा छळ केला
याप्रकरणी पीडितेने धुळे शहर पोलिसात तक्रार दिली होती. शून्य क्रमांकने तो गुन्हा बुधवारी पीडितेचा मोठा दीर, जाऊ, सासू आणि सासरे या चार जणांविरोधात मारवड पोलिसांत दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहेत.
दरम्यान, पीडितेला आधार नसल्यामुळे तिला जळगावच्या आशादीप महिला संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले. तर संशयित दीर गोपाल भोई याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0 Comments