पहूर कसबे तालुका जामनेर येथील पूनमचंद गुलाबचंद वर्मा यांचे लोहारा तालुका पाचोरा येथे मेघराज ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे. ते नेहमी प्रमाणे आपले दुकान बंद सायंकाळी सात वाजता लोहारा येथून पहुरकडे येत असायचे. परंतू १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गोगडीच्या पुलाजवळ रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे हे पथकासह घटनास्थळी धाव घेतली वर्मा यांचा मृतदेह पहुर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मयत पूनमचंद गुलाबचंद वर्मा यांच्या पश्चात आई, पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी, व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
मयत वर्मा यांचा कुठल्या तरी तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला आहे. तर वर्मा यांच्या जवळ असलेली बॅग व मोबाईल हे गायब असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी लुटीमारीच्या उद्देशाने हेतूने हा खून झालाय का?, याबाबत चौकशी सुरु केली आहे.याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात प्रकाश शांतीलाल वर्मा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान, पोलिसांनी तीन संशयित ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे.
0 Comments