पन्नास खोके एकदम ओके'नंतर जाणून घ्या, दुसरा दिवस कोणत्या मुद्द्यांवर गाजणार

ठाकरे सरकार अल्पमतात आणून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवसी सरकारच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षातील नेत्यांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटाचे 50 आमदार ज्यावेळी विधिमंडळात आले त्यावेळी विरोधी नेत्यांनी आले रे आले गद्दार आले यासह 50 खोके एकदम ओके आदी विविध घोषणा दिल्या. पहिल्या दिवशीची घोषणाबाजीनंतर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून, आज विरोधक सरकारला विविध मुद्यांवरून पेचात पकडण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटचा मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी पाहण्यास मिळू शकते. आज कोणते मुद्दे गाजणार? पावसाळी अधिवेशनाच्या दुसरा दिवस विरोधकांच्या प्रस्तावास विविध मुद्यांवरून गाजण्याची चिन्ह आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, कायदा व सुव्यवस्था यास ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना या मुद्द्यांवरून शब्दीक वाद रंगण्याची शक्यता आहे. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधक सभागृहाच्या पायऱ्यांवर कालप्रमाणेच जोरदार घोषणाबाजी करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात. पहिल्या दिवशी काय घडलं? पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री एखनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. तसेच जगदीप धनखड यांचेही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे अभिनंदन केले. मुर्मू यांच्यामुळे देशातील स्त्री शिक्षण, स्त्री हक्काला बळ मिळेल अशा भावना अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e