टिटवी (ता. पारोळा) येथील शेतकरी सोमनाथ जयराम महाजन हे पारोळा येथील स्टेट बँक शाखेतून आपल्या खात्यातील रोख रक्कम 83 हजार रुपये काढून दुचाकीने सहकार्यासोबत गावी जात होते. दरम्यान रस्त्यातच (चोरवड नाका) येथे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी खेचून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी टिटवी येथील युवक घनश्याम छोटूलाल महाजन याने आपल्या जीवाची पर्वा न करता चोरट्यांकडून पैशांची पिशवी हिसकावुन घेत सदर रक्कम शेतकऱ्यांच्या ताब्यात दिली.
आमदारांनी केला सत्कार
सदर युवकाच्या धाडसीपणाची दखल घेत आमदार चिमणराव पाटील यांनी घेऊन त्याच्यावर शाब्बासकीची थाप फिरवली. याप्रसंगी बाजार समितीचे माजी संचालक चतुर पाटील, शेतकी संघाचे माजी संचालक गोविंद पाटील, शेतकी संघाचे संचालक जिजाबराव पाटील, सखाराम चौधरी, माजी जि. प. सदस्य पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याला कसा आवर घालता येईल. याबाबत पोलिसांनी निरीक्षकांना सूचना करणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.
0 Comments