गुडघाभर पाणी साचलेल्या शेतातील संपूर्ण पीक सडण्याची भीती देखील आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत कर्जबाजारी होऊन शेतात पेरलेल्या पिकाची पावसामुळे झालेल्या नासाडीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या संदर्भात कुठल्याही कृषी अधिकाऱ्याकडून तसेच कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याकडून साधी पाहणी देखील केली जात नसल्याची खंत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments