आळीपाळीने या दोघांनी वेडसर महिलेवर 12 ऑगस्ट रोजी दुपारी जंगलात बलात्कार केला. पिली गावाजवळ असलेल्या जंगलात नराधमांनी हे संतापजनक कृत्य केलं असल्याचं समोर आलंय.पीडित महिला ही 20 वर्षांची तरुणी असून या वेडसर महिलेचे लग्नही झाले होते. काही दिवसांपूर्वी पती-पत्नीचं पटत नसल्यानं तिच्या पतीने तिला माहेरी आणून सोडलं होतं. धामी तालुक्यात या पीडितेला लग्न करुन सासरी पाठवण्यात आलं होतं. पण लग्नानंतर झालेल्या वादामुळे पतीने या पीडितेला तिच्या काकाकडे आणून सोडलं होतं. शुक्रवारी रात्री सेमाडोह येथील चौकात ही महिला उभी असताना दोघा नराधमांनी येऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.
सामूहिक बलात्कार झालेल्या या जखमी महिलेवर सध्या खासगी डॉक्टरांकडे उपचार सुरु आहेत. तर चिखलदार पोलिसांत देण्यात आलेल्या फिर्यादीवर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तसंच संशयित आरोपी असलेल्या सुनी आणि सुखराम या दोघांना अटकही केली आहे. सध्या या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे चिखलदरा परिसर हादरुन गेला असून संपूर्ण अमरावतीत खळबळ माजलीय.
0 Comments