हातेड येथील ५० वर्षीय महिलेची अनेर नदीमध्ये आत्महत्या

बभळाज (जि. धुळे) : शिरपूर चोपडा रस्त्यावरील तोंदे गावाजवळील अनेर नदीच्या पुलावरून हातेड (ता.चोपडा) येथील ५० वर्षीय महिलेने शनिवारी (ता.१३) सकाळी दहाच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. थाळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती थाळनेर पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. संबंधित महिलेची तपासणी केली असता या महिलेकडे रोख बत्तीस हजार रुपये व हातेड ते गलंगी असे बसचे तिकिट आढळले. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता ही महिला हातेड (ता. चोपडा) येथील बेबाबाई शिवाजी सनेर (५०) असल्याचे निष्पन्न झाले. बेबाबाई या शिवाजी भीमराव सनेर यांच्या पत्नी तर मिलिंद शिवाजी सनेर यांच्या आई होत्या. मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे पाठविण्यात आला. महिलेजवळ मिळालेली रक्कम बत्तीस हजार रुपये पतीच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे यांनी सांगितले. पुढील तपास स.पो.नि. उमेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय ठाकुर करीत आहेत तालुक्यातील सावळदे व सुकवद वरील तापी पुलानंतर आता अनेर नदीवरील पुल हा आत्महत्या करण्याचे ठीकाण ठरणार का अशी भीती परीसरात व्यक्त करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e