याबाबत 63 वर्षाच्या तक्रारदाराने लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळवारी (दि.20) तक्रार केली. तक्रारदार यांच्या पत्नी सदानंद प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना एक आठवड्याची अर्जित रजा पाहिजे असल्याने त्यांनी रजेचा अर्ज दिला होता. रजा मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांना शाळेत बोलावून घेऊन यांच्याकडे 7 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 6 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लातूर एसीबीकडे तक्रार दिली.
लातूर एसीबीच्या पथकाने मंगळवारी पडताळणी केली असता लिपीक शशिकांत खरोसेकर
याने पंचासमक्ष 7 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 6 हजार रुपये लाच मागितली.
लाचेची रक्कम शाळा सुटण्याच्या वेळेत मुख्याध्यापक यांच्या कार्यालयात पंचासमक्ष मुख्याध्यपक सुधाकर पोतदार यांच्यासमोर खरोसेकर याने स्विकारली.
खरोसेकर याने लाच स्विकारुन लाचेची रक्कम पोतदार यांच्याकडे दिली. पथकाने दोघांना रंगेहात पकडून लाचेची रक्कम जप्त केली.
ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदें
अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण
लातूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली
0 Comments