जळगाव जिल्ह्यात सव्वा लाखांची गावठी दारु नष्ट

चाळीसगाव -तालुक्यातील चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या दारुभट्टीवर  पोलिसांनी धाड टाकूण तब्बल २ लाख ११ हजार ५३० रुपयांची दारु, कच्चे रसायन नष्ट  केले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात वेगवेगळे २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, सपोनि.धरमसिंग सुंदरडे, सपोनि. हर्षा जाधव, पोउपनि. लोकेश पवार आदिच्या पथकाने वाघळी, लोणजे, गणेशपूर, हिरापूर परिसरात गणेशोत्सवाच्या काळात अवैधरित्या सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर छापे टाकूले.

मागील २३ ठिकाणी दारुच्या भट्ट्यांवर छापे टाकूण २ लाख ११ हजार ५३० रुपये किमती दारु, कच्चे रसायन नष्ट केले आहे. तसेच पत्ता व मटका जुगारावर छापे टाकूण ८ गुन्हे दाखल करुन, त्यात २२ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e