मुलाचे अपहरण करून खून; चौघांना जन्मठेपीची शिक्षा

जालना : सहा वर्षापुर्वी लग्‍न सोहळ्यातून लहान मुलाच अपहरण करून खून केल्या प्रकरणी चौघांना जन्मठेपीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. सहा वर्षानंतर निकाल लागल्‍याने मुलाच्‍या आई– वडीलांनी न्‍यायालयाचे आभार व्‍यक्‍त केले. 
जालना  शहरात सहा वर्षांपूर्वी जालना शहरात आहिर गवळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यातुन अडीच वर्षीय सक्षम जोडीवाला या लहान मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी सक्षम यांच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासांमध्ये या मुलाचे अपहरण करून मंठा चौफुली परिसरात असलेल्या एका प्लॉटवर नेऊन सक्षमची दगडाने ठेचून हत्या  करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.

त्‍या चौघांचा होता समावेश

याप्रकरणी पोलिसांनी सक्षम यांच्या आई– वडील याच्याशी जुन्या वादाच्या रागातून रामेश्वर जोडीवाले, मुकेश जोडीवाले, नीतू जोडीवाले आणि पवन जोडीवाले या चौघांना सक्षमची हत्या केल्याचा प्रकार उघड करत चौघांविरुद्ध अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

सहा वर्षानंतर निकाल

दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाने या हत्या प्रकरणातील ॲड. वर्षा मुकिम व ॲड. अश्विनी मते यांनी युक्तिवाद एकून सर्व साक्षीदार आणि पुराव्याच्या आधारे निकाल देताना चारही आरोपीना न्या. के. एम. जैस्वाल यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सहा वर्षानंतर दोषींना कठोर शिक्षा सुनावण्यात आल्याने सक्षमच्या आई वडिलांकडून न्यालायचे आभार व्यक्त करत न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केल्या आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e