मुक्ताईनगरात एमआयडीला सरकारकडून मंजुरी मिळाल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांतर्फे फटाक्यांची आतिष बाजी करत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. गेल्या २५ वर्षापासून मुक्ताईनगरचा विकास झालेला नव्हता, टपरीयुक्त मुक्ताईनगर शहर झालेले होते, येथील तरुणांना बाहेरगावी रोजगारासाठी जावे लागत होते, केवळ दोन ते तीन माणसांचा विकास म्हणजे शहराचा विकास नाही, म्हणत नाही, असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर निशाना साधला आहे.
आमदार चंद्रकांत पाटील हे खरोखर मुक्ताईनगरचा विकास करत आहे, व त्याचेच उदाहरण म्हणजे एमआयडीसीला मिळालेली मंजुरी आहे, यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळणार असल्याचेही कार्यकर्ते म्हणाले.
एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरच्या नावापासून सर्व विकास मी केला असल्याचे सांगितले होते. आमदार चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विकासाचे आव्हान दिले होते. त्यामुळे निर्णयातून एकनाथ शिंदे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले असून एकीकडे आमदार चंद्रकांत पाटील यांना बळ देत दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी दिलेले आव्हान स्वीकारत त्यावर जोरदार उत्तर दिल्याचेही आता बोलले जात आहे.
0 Comments