जळगावच्‍या आरटीओ कार्यालयाचा दर्जा वाढला; स्‍वतंत्र आरटीओ कार्यालय

जळगाव : जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाऐवजी आता आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय  मंजूर झाले आहे. शासनाने त्याचा आकृतीबंध मंजूर केला असून परिवहन आयुक्त कार्यालयात पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.
जळगावात  असलेल्‍या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा आता वाढला आहे. नव्या आकृतीबंधानुसार प्रत्येक कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तीन सहायक परिवहन अधिकाऱ्यांची पदे वाढली आहेत. राज्यात आरटीओच्या १२ पदांची वाढ झाली आहे. आठ कार्यालयांसह परिवहन आयुक्त कार्यालयात चार पदे निर्माण करण्यात आलेली आहेत.

धुळ्याच्‍या अंतर्गत होते जळगाव कार्यालय

राज्याच्या गृहविभागाने सुधारित आकृतीबंधास मान्यता दिली असून २३ सप्टेंबरला शासन निर्णय पारित केला आहे. त्‍यानुसार जळगावला सध्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. ते धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत आहे. मात्र आता स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय होणार आहे. महसुली विभागाप्रमाणेच राज्यातील सहा विभागीय कार्यालयातील उपायुक्तांनादेखील सहआयुक्तांचा दर्जा दिला जाणार आहे. जळगाव जिल्हा मोठा व क्षेत्रफळही मोठे असल्याने चाळीसगावला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव होता. मात्र, आता तो भडगावचा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e