पिंगळाई नदीत घडलं अघटित; तहसीलदारांसह पाेलिसांची कुमक दाखल, मृतदेहांचा शोध सुरू

अमरावती  जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या पिंगळाई नदीमध्ये  मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तीन मच्छीमारांचा बुडून  मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेची माहिती समजताच जिल्ह्याचे शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या घटनास्थळी बघ्यांची देखील माेठी गर्दी झालेली आहे 

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तीन मच्छीमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले हाेते. त्यांचा याच नदीत बुडून मृत्यू झाला. ही माहिती समोर आल्यानंतर काहींनी पाेलिसांना आणि प्रशासनाला कळविले.

घटनास्थळावरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार हे तीनही मच्छीमार तिवसा तालुक्यातील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैभव फरतारे हे देखील घटनास्थळी पाेहचले. तसेच जिल्हा व शोध बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. सध्या तीनही मच्छीमारांच्या मृतदेहाचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली. या घटनेची वार्ता परिसरात धडकताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e