रायगड : येथील मुरूड तालुक्यात एका विवाहित महिलेचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धनगरवाडी-महलोर रस्त्यावर प्रियकराने एका विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृददेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूनम असं मृत तरुणीचं नाव असून ती २१ ऑगस्टपासून अलिबाग येथून बेपत्ता होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवत प्रकरणाचा छडा लावला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सचिनला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील धनगर वाडी-महलोर रस्त्यावर प्रियकराने विवाहीत महिलेची हत्या करून मृतदेह जाळल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर या घटनेचा कसून तपास केला. प्रेमसंबंधातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. प्रेमीयुगुलांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वादविवाद होऊन हत्याकांड झाल्याचं तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे.
0 Comments