मैत्रीच्या नात्याला काळीमा! फक्त २२ हजारांसाठी मित्राने केला घात, पुढे जे केले ते संतापजनक च

अमरावती : जीवाला जीव देणारे अनेक मित्र आपण चित्रपटातही पाहतो आणि आयुष्यात देखील बघतो. मात्र, अमरावती जिल्ह्यातील एका क्रूर मित्राने अवघ्या २२ हजार रुपयांसाठी मित्राचा घात केला. तसेच त्याला संपवून त्याचा मृतदेह चिखलात फेकल्याचा संताप जनक प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. फक्त २२ हजारांसाठी मित्राने केला घात, पुढे केले संतापजनक कृत्य दिनांक ८ सप्टेंबर रोजी अंजनगाव बारी ते कोंडेश्वर रोडवर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात एका व्यक्तीचा (वय अंदाजे २० ते २५ वर्षे) मृतदेह सडलेल्या अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी जाऊन प्रेताची पाहणी केली असता त्याच्या छातीवर, पोटावर, खांद्यावर व डाव्या पायाच्या पोटरीवर मार लागल्याचे दिसले. या प्रेताची ओळख पटवून त्याचे नाव खुशाल उर्फ छोटू तेज अन्ना गोपे (वय २२ वर्षे, रा. पोचबंगला जु.व. बडनेरा) असे समजले.
दिनांक १४ सप्टेंबर रोजी फिर्यादी रमन तेज अन्ना गोपे (वय २९ वर्षे, रा. पाचबंगला जु. व. बडनेरा) यांनी पोलीस स्टेशनला येऊन जबानी रिपोर्ट दिला. त्यानुसार, त्याचा लहान भाऊ खुशाल उर्फ छोटू तेजअन्ना गोपे हा त्याला दिनाक ३ सप्टेंबर रोजी घरी भेटला. त्याने त्या दिवशी पैशाची खूप उधळपट्टी केली होती. त्याच्या जवळ १४ ते १५ हजार रुपये असल्याचे त्याने स्वत: पाहिले. त्याला पैशांबाबत विचारले असता त्याने रमन याच्याशी भांडण केले. त्याच्या भावाचा मृत्यू पैशांच्या कारणाने झाला आहे. त्यानंतर बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीबाबत अत्यंत परिश्रम घेऊन मृतकासोबत घटनेच्या दिवशी कोण कोण होते या बाबत अत्यंत कौशल्याने गुप्त माहिती काढून घटनेच्या दिवशी त्याच्या सोबत असलेले मृतकाचे मित्र संकेत नरेंद्र पिंगळे (वय २२ वर्षे), रोशन दिलीप झंझाड (वय २४ वर्षे) यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करण्यात आली. यामध्ये दोन्ही आरोपींनी पैसे चोरी गेल्याच्या कारणावरून मृतकाशी वाद केला. त्यानंतर त्याची हत्या केली अशी कबुली दिली.
कारवाई बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाबाराव अवचार, क्राईमचे पोलीस निरीक्षक विजय दिघे, पोलीस उपनिरीक्षक मारोडकर, व डी. बी. पथकाचे प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश हरिभाऊ मोरे, नाक्रोटिक्स पोलीस कॉन्स्टेबल विकास वाकोडे, इरफान रायलीवाले, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत गावंडे, रहीम अकदिर, मनमोहन दहातोंडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e