आधुनिक डिजीटल युगात वावरतांना किंवा समाजमाध्यमांचा वापर करतांना सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. दरम्यान अशीच काही घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात घडली आहे. इन्स्टाग्रामवरून क्रिप्टो ट्रेडिंग करून अर्ध्या तासात पैसे डब्बल करून देतो अशा थाप मारून एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने तब्बल 71 हजारांचा चुना लावला. दरम्यान अखेर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला सुरतमधून अटक केली आहे. सय्यद महंमद उनेस मियाँ हाफीज (वय 30 वर्ष, रा. 101, अलकुरेशी अपार्टमेंट, नानपुरा मार्केट, सुरत राज्य गुजरात) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कन्नड येथील तक्रारदार यांनी पोस्टे सायबर येथे संपर्क करून माहिती दिली की, त्यांचे मुलास अज्ञात इन्स्टाग्राम खात्याचा वापरकर्ता याने क्रिप्टो ट्रेडिंग करून अर्ध्या तासात पैसे डब्बल करून देतो अशा थाप मारून 71080 रूपयांचा भरणा करून घेवून फसवणूक केली आहे. यावरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
0 Comments