कोण आहे गजा मारणे?
गजा उर्फ गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या आहे. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गुंड गजाजन मारणे याच्यावर 2014 मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजाला 2014 पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर गजाची सुटका झाली.
गजा मारणेचा मुलगाही टवाळखोर
कुख्यात गुंड गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश मारणे हा देखील काही कमी नाही. २३ मार्च २०२२ ला त्याच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेशवर सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश मारणे आणि पीडित तरुणी गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी आरोपीने काही व्हिडिओ तयार केले होते. तसेच पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचेही या तक्रारीत सांगण्यात आले आहे.
0 Comments