२८ घरांची झडती, ९ ठिकाणी छापा; बाथरूम, हौद पाहताच पाेलीसांना बसला धक्का

सोलापूर जिल्ह्यात पाेलीसांनी एका विशेष माेहिमेतून २८ घरांची झडती घेतली. तसेच ९ ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पाेलीसांना बाथरूम तसेच हौदात देखील बेकायदेशिररित्या तयार केली जाणारी दारू सापडली. त्यामुळे चुकीचं काम करणा-यांना पुन्हा एकदा चपराक बसली आहे. 
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा गावातील तब्बल 28 घरांची सोलापूर ग्रामीण पोलिसांनी झाडाझडती करण्यात आली. तसेच नऊ ठिकाणी छापे टाकून साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकारणी नऊ जणांवर सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे 
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरु केलेल्या 'ऑपरेशन परिवर्तन' अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३० हजार ८०० लिटर गूळमिश्रित रसायन बॅरल, सिमेंटच्या हौदामधील, ८४० हातभट्टीची दारू रबरी ट्यूब आणि कॅनमधील २४० लिटर गूळपाक जप्त करण्यात आला आहे अशी माहिती नामदेव शिंदे (सहपोलीस निरीक्षक) यांनी दिली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e