यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून हत्या केली आहे. घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील वाकी दुधाना शिवारात ही घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. गजानन दत्ताजी ढोणे (26रा. बेलोरा) असे तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या केली आहे. तरूणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणी अल्पवयीन आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरूण गजानन आणि तरूणी यांचे प्रेमप्रकरण होते. गजानन यवतमाळच्या बेलोरा या गावात राहायचा. प्रेयसीला घेऊन एकांताच्या शोधात घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील वाकी दुधाना शिवारात आले. एका पडीक शेतात भेटीसाठी गेले. गप्पा मारताना अचानक त्यांच्यात वाद झाला. तयारीने आलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि नंतर स्वतः झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
गजानन दत्ताजी ढोणे (26रा. बेलोरा) असे मृत प्रियकराचे नाव आहे. प्रेयसी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे. हे दोघेही दुचाकीने घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथून एकांताच्या शोधात वाकी दुधाना शिवारात आले. प्रेमात धोका दिल्याचा राग गजाननच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने सोबत चाकू व कटर आणले होते. गजाननने कोमलच्या गळ्यावर चाकूने वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. नंतर तिच्या ओढणीने गजाननने झाडाला गळफास लावून घेतला. यात गजाननचा जागीच मृत्यू झाला.
0 Comments