मिळालेल्या माहितीनुसार, यश संजय तिवारी असं हत्या झालेल्या भाच्याचं नाव आहे. तर सतीश राजनारायण दुबे असं आरोपी मामाचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सतीश हा बहिण सरिता तिवारी यांच्या घरीच रहात होता. सरिता यांच्या घरात तिचा पती, मुलगा यश व सरिताचे वडील आणि आरोपी सतीश असेचार जण एकत्र रहात होते
घरगुती वादातून सतीशने वडील आणि सरिताचा पती संजय यांच्याशी भांडण सुरू केले. शिवीगाळ करुन तो दोघांना मारहाण करण्यास धावत होता. भांडण सोडविण्यासाठी भाचा यश याने हस्तक्षेप केला, त्याचा राग सतीशला आल्याने त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील धारदार चाकूने सर्वांसमोर यशवर सपासप वार केले व तेथून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यशचा जागीच मृत्यू झाला असून मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपी मामाला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे.
0 Comments