मिळालेल्या माहितीनुसार, खरगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिसुनापूर बाजारात अजमल नावाची व्यक्ती क्लिनिक चालवतो. मागील बुधवारी त्याच्या क्लिनिकमध्ये उपचारांसाठी एक रुग्ण महिला आली. त्यावेळी आरोपी डॉक्टरने महिलेला झोपेचे इंजेक्शन दिले. त्यानंतर महिला तिथेच निपचित पडली. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. या कृत्याचा व्हिडिओही त्याने काढला. दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता.
आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे
पथक आरोपीच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. मात्र, तोपर्यंत तो क्लिनिक बंद करून फरार झाला होता. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. ते रस्त्यावर उतरले होते. आरोपीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तसेच बाजारपेठ बंद करण्यात आली होती. संतप्त नागरिकांनी आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला जावा, अशी मागणी केली. त्याच दिवशी संध्याकाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
क्लिनिकमध्ये सापडली बंदी घातलेली औषधे
पोलिसांनी क्लिनिकमध्ये झडती घेतली असता, अनेक बंदी घातलेली औषधे सापडली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई करत क्लिनिक सील केले आहे. या प्रकरणी आरोपी डॉक्टरविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत
0 Comments