दोंडाईचा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे काँग्रेसला भाजपने दणका दिला आहे. तीन नगरसेवकांसह जवळपास 200 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथे सर्वच पक्षांतर्फे मोट बांधणी केली जात आहे. असे असतानाच काँग्रेसचे तीन नगरसेवक व 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे.
भाजपचे वर्चस्व
यापूर्वी दोंडाईचा नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व बघायला मिळाले आहे, या निवडणुकीमध्ये देखील भाजपतर्फे पुन्हा एकदा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.
0 Comments