तळा शहरात धक्कादायक घटना, नगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीची महिलेस दिवसाढवळ्या मारहाण, गुन्हा दाखल

माणगाव : माणगाव विभागात येणाऱ्या तळा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल पारखे या महिलेला तळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर आणि त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांनी दिवसा ढवळ्या हाताने लाथेने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
तळा शहरातील मंगल पारखे या महिला आपल्या पगाराचे पैसे अद्यापही देण्यात आले नाहीत म्हणून तळा नगरपंचायत येथे माहिती काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर व त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांनी तू पुन्हा नगरपंचायत कार्यालयात आलीस तर तुला ठार मारू अशी धमकी दिली असा आरोप पारखे यांचा आहे. या धमकीनंतर त्यांनी हाताने व लाथेने मंगल पारखे यांना बेदम मारहाण केली.
नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबत नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर व त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांच्यावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e