सावधान! सॉफ्टवेअर डाऊनलोड करताय, बसेल लाखो रुपयांना गंडा, कारण...

वर्धा : एक धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीला सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला लावून 1 लाख 72 रुपयांना गंडा घातला आहे. बाबाराव मून असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. इलेक्ट्रिक बिल अपडेट होत असल्यामुळं मनू यांना थकबाकी दाखवणारा मसेज मोबाईलवर आला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी मनू यांना त्यांच्या जाळ्यात अडकवून ऑनलाईन फसवणूक केली. 
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी मनू यांना दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करण्यास सांगितलं. त्यावेळी भरणा केलेले पैसे आमच्या साईटवर अपडेट होत नाहीत, यासाठी तुमच्या ऑनलाईन अॅपमध्ये सुधारणा करावी लागेल, असं सांगण्यात आलं. त्यानंतर एक अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या खात्यातून  आधी शंभर रूपये काढले गेले.
यांना सायबर चोरट्यांनी कार्डची माहिती मेसेज करायला सांगितली. त्यांनी काढलेली रक्कम लवकरच परत मिळेल, असं सांगून चोरट्यांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून 1 लाख 72 हजारांची रक्कम लुटली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e