घरी बोलवून आधी दारुची पार्टी दिली अन् नंतर कोयत्याने वार केले, कल्याणमध्ये मित्राकडून मित्राची हत्या

मुंबई :  कल्याण पूर्वेतील तिसगावनाका येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.  उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याने मित्राने मित्राची हत्या केली आहे.  बिपिन दुबे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर  राजेश्वर पांडे असे संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित पांडे याला ताब्यात घेतले आहे. कोयत्याने वार करून ही हत्या करण्यात आलीय.

्पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश्वर पांडे याने त्याचा मित्र बिपिन दुबे याची कोयत्याने वार करत  हत्या केली आहे.  ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात आज दुपारच्या सुमारास घडली आहे.  याप्रकरणी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात राजेश्वर पांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण पूर्व परिसरात तिसगाव नाका येथील एका इमारतीमध्ये राजेश्वर पांडे राहतो. याच परिसरात राहणारा बिपिन दुबे हा राजेश्वर पांडे याचा मित्र होता. बिपिन दुबे याने काही महिन्यांपूर्वी राजेश्वर पांडे याच्याकडून काही कामानिमित्त साडे चार लाख रुपये  उसने घेतले होते.  राजेश्वर याने अनेक वेळा बीपीनकडे पैशांची मागणी केली. मात्र बिपिन टाळाटाळ करत होता. आज दुपारी राजेश्वर याने बिपिनला घरी  बोलावलं. दोघांनी दुपारच्या सुमारास  मटन खाल्लं, मद्यपान केलं.  त्यानंतर राजेश्वरने बिपीनकडे पैसे मागितले. परंतु, यामुळे दोघांमध्ये  वाद झाला. या वादातून राजेश्वरने बिपिनवर कोयत्याने वार करत बीपीनची हत्या केली 

संशयिताने स्वत: पोलिसांना दिली माहिती
धक्कादायक बाब म्हणजे राजेश्वर याने बिपीन याची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:  कोळशेवाडी पोलिस ठाण्यात फोन करून मी बिपीनची हत्या केल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत बीपीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर आरोपी राजेश्वर पांडे याला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली. 


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e