महिलांकडे अश्लील नजरेने बघणाऱ्या तरुणाला हटकले; हटकणाऱ्या दोघांचा खून

महिलांकडे अश्लील नजरेने बघतो म्हणून हटकल्याने दोघांचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना पिंपरी-चिंचवड च्या म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सुरज नंदकुमार चव्हाण (वय २७) आणि अनिकेत किसन पवार (वय २४) दोघे रा. सावरदारा ता. खेड अशी खून झालेल्या तरुणांची नाव आहेत. या प्रकरणी प्रदीप दिलीप भगत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पिंपरी- चिंचवड पोलीस घेत आहेत. 
ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी स्वप्नाली सूरज चव्हाण (वय २०) वर्षे, रा. सावरदारी ता. खेड यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप हा महिलांकडे एकटक अश्लील नजरेने बघायचा. तो अगोदर काम करत असलेल्या ठिकाणी देखील अशीच माहिती पोलिसांना मिळाली. खून झालेल्या  सावरदरा येथील घटनास्थळाच्या परिसरात आरोपी नेहमी येत असायचा. तिथं तो महिलांकडे पाहायचा त्यामुळं त्याला तेथील नागरिकांनी देखील समज दिली होती. परंतु, तिथं ओळखीच्या महिलेकडे येण्याचा बहाणा करून तो त्या परिसरात यायचा. शनिवारीसुद्धा सायंकाळी आला पण तू या परिसरात का? आलास म्हणून खून झालेल्या सूरज आणि निकेतन यांनी हटकले. त्यांच्यात बाचाबाची झाली. आरोपी प्रदीप तिथून निघून गेला आणि काही मिनिटांनी परतला. त्याने दोघांवर थेट चाकूने वार केले. एकाच्या छातीत आणि दुसऱ्याच्या मांडीच्या शेजारी वार केला. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली असून पिंपरी-चिंचवड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e