चाळीसगावात मुसळधार पाऊस; तितूर- डोंगरी नद्यांना पूर

चाळीसगाव : मागील काही तासांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे चाळीसगाव  शहरातून वाहणाऱ्या तितूर-डोंगरी नद्यांना पूर आला आहे. शहरातील मोठा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे 
मागील वर्षी शहरासह तालुक्यात ३० ऑगस्टच्या मध्यरात्री अचानक अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने क्षणात होत्‍याचे नव्हते केले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घरांसह जनावरे वाहून गेली. तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिराहून नेला होता. शहरातून वाहणाऱ्या तितूर-डोंगरी नद्यांना गत वर्षी तब्बल ७ वेळा पूर आला. या पुराचा पाणी अनेकांच्या घरात घुसला होता.

मोठा पुल पाण्याखाली

यानंतर परतीच्‍या मुसळधार पावसाने गुरुवारी (६ ऑक्‍टोंबर) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा तितूर-डोंगरी नद्यांना पूर आला आहे. शहरातील मोठा पूल देखील पाण्याखाली गेला असून पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. यामुळे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहे. पावसाने जोर वाढल्‍यास वित्तहानीसह जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधान राहावा असा इशारा नागरपालिकेसह प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e