अकोला शहरात 24 तासांत दोन हत्येच्या घटना समोर आल्याने शहर हादरले आहे. शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर काल पुन्हा अकोल्यात एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोल्यातील भगत वाडी परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. अमीन खान असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
धारदार शस्त्राने अमीन खान यांच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर हल्लेखोर फरार. अमीन खान यांच्या हत्येमागील नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान 24 तासात अकोला शहरात दुसरी हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे
१ दिवसापूर्वी विशाल कपले या शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा तपास सुरू असताना काल पून्हा एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस कमी पडत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे नव्याने रुजू झाल्यानंतर आठवडाभरात तीन खुनाच्या घटना आणि एक प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत असून आरोपींना लवकरच पकडण्यात येईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
0 Comments