अमरावती : जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी (सीईओ) करिष्मा वैद्य यांना २० हजार रुपयांची लाच घेतांना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
भातकुली नगरपंचायत अंतर्गत एका तक्रारदार यांना दुकानांमध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी सीईओ वैद्य यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची लेखी तक्रार प्राप्त झाली.
वीस हजार घेतांना अटक
पन्नास हजाराचा मागणी केल्यानंतर तळजोडीअंती २० हजार देण्याचे निश्चीत झाले. यानुसार आज सीईओ करिष्मा वैद्य यांनी २० हजार रुपयाची लाच स्वीकारली. याचवेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने करिष्मा वैद्य यांना रंगेहात अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
0 Comments