3 हजाराची लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात, पोलीस ठाण्यातच स्विकारली लाच

पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या बेलेबल वॉरंटमध्ये अटक  न करण्यासाठी व कदबा भरून न्यायालयात अहवाल सादर केल्याच्या मोबदल्यात 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन तीन हजार रुपये लाच स्विकारताना  पालघर जिल्ह्यातील अर्नाळा पोलीस ठाण्यातील  पोलीस हवालदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. कमलाकर बिरबा मदने (वय 44) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ठाणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अर्नाळा पोलीस ठाण्यात केली.

याबाबत 28 वर्षीय व्यक्तीने ठाणे एसीबीकडे  सोमवारी (दि.19) लेखी तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या वडिलांचे बेलेबल वॉरंट अर्नाळा पोलीस ठाण्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये अटक न करता कदबा भरून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला होता. याचा मोबदला म्हणून पोलीस हवालदार कमलाकर मदने यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली.

ठाणे एसीबीच्या युनिटने आज (मंगळवार) पडताळणी केली असता पोलीस हवालदार कमलाकर मदने यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसर आज अर्नाळा पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये लाच घेताना कमलाकर मदने यांना रंगेहात पकडण्यात आले.
मदने यांच्यावर अर्नाळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे  अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप
पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास 
पोलीस अंमलदार अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा, नवनाथ भगत,
सखाराम दोडे, स्वाती तारवी यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e