तू फुकट सरपंच झालीस! महिला सरपंचाच्या घरात घुसले; बुलढाण्यात धक्कादायक प्रकार घडला

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यात अशीच एक धक्क्दादायक घटना समोर आली आहे. घरात घुसून एका महिला सरपंचाला मारहाण करण्यात आली आहे.

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सारशिव गावात महिला सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली. तु फुकट सरपंच झाली असं म्हणत १४ ते १५ लोकांनी या महिला सरपंचाला घरात घूसून मारहाण केली आहे. इतकंच नाही तर या लोकांनी सरपंच महिलेच्या मुलांना देखील मारहाण केली.
मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींविरुद्ध महिला सरपंच रमाबाई जाधव यांनी सुरुवातीला जानेफळ पोलीस स्टेशन गाठले. मात्र, त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. नंतर थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या सरपंच महिलेने तक्रार दाखल केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयातून तक्रार घेऊन त्या महिलेला पुन्हा जानेफळ पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले.
मात्र, ती महिला ताटकळत जानेफळ पोलीस स्टेशनला बसलेली होती. तरीही मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महिला सरपंच हतबल झाल्या आहेत. मारहाणीत हात फ्रॅक्चर झाला असल्याचा आरोप महिला सरपंचाने केला आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर प्रकाराचा असूनही पोलीस मात्र या घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत.

आता त्या सरपंच महिलेला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत असून सरपंच महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, घरात घुसून महिला सरपंचाला अशाप्रकारे मारहाण केली गेल्याने जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e